💥परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात गरीबांच्या तोंडचा घास स्वस्त धान्य तस्कर चोरांच्या घशात...!



💥मानवत येथील शासकीय स्वस्त धांन्यातील ५१० पोते तांदूळ तस्करी; ३ व्यापाऱ्यांसह चालकाविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल💥

परभणी (दि.०६ सप्टेंबर) - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन संचारबंदीचा गोरगरीब रोजमजूर शेतमजूर दिव्यांग आदींवर उपासमारीची वेळ येऊ नयें याकरिता केंद्र शासनाकडून मोफत तर राज्य शासनाकडून अल्पदरात शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून वाटप करण्यासाठी आलेला गोरगरीबांच्या मुखातील घास स्वस्त धान्य तस्करांच्या घशात जात असल्याचे उघड होत असून पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचारी तसेच किरकोळ शासकीय स्वस्त धान्य दुकानदार व खादीच्या आडून स्वस्त धान्याची तस्करी करणाऱ्या पेशेवर चोरांच्या संगणमतातून मोठ्या प्रमाणात शासकीय स्वस्त धांन्याची तस्करी होत असल्याचे पुन्हा उघड झाले असून जिल्ह्यातील मानवत पोलिसांनी दि.२२ ऑगस्ट रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान पकडलेल्या ५१० पोते शासकीय तांदूळ प्रकरणी काल शनिवार दि.०५ सप्टेंबर रात्री उशीरा ३ व्यापार्‍यांसह चालक व अन्य एकावर गुन्हे दाखल केले आहेत.

मानवत पोलिसांनी २२ ऑगस्ट रोजी शनिवारी रात्री महामार्गावर पेट्रोलिंग करताना एक भरधाव जाणारा ट्रक (आरजे ०४, जीबी ८८८८) थांबवला. चालकाची विचारपुस केली. तेव्हा तो ट्रक चालक गरबडला. पोलिसांनी ट्रकमधील पोत्यांची पाहणी केली तेव्हा त्यात ५१० पोते असल्याचे निदर्शनास आले. पोत्यांची तपासणी केली असता त्यात तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांचा संशय बळावला. ट्रकचालक त्या तांदळांच्या  पोत्याबद्दल समाधानकारक खुलासा करू शकला नसल्याने पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून उभा केला. पोलिस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पवार यांनी मानवत महसूल प्रशासनास तांदळाबाबत कल्पना दिली. महसूल यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी त्या ट्रकमधील तांदळाचे नमुने ताब्यात घेतले. तांदळाचा तो साठा राशनचा म्हणजेच स्वस्तधान्य दुकानातील आहे की नाही, याबाबत महसूल प्रशासन पोलिसांना काही सांगत नसल्याने पोलिस यंत्रणा त्यांच्या अहवालाच्या प्रतिक्षेत होती. शनिवारी तहसीलदारांनी एक पत्र देत तो तांदूळ राशनचा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मानवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या