💥गंगाखेडला आवाजासह धक्का चौकशी व्हावी - गोविंद यादव💥तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी💥 

गंगाखेड (दि.२४ आॕगस्ट) - गंगाखेड शहर आणि परिसरात आज मोठ्या आवाजासह धक्क्याने हादरला. हा आवाज आणि धक्का नेमका कशाचा होता, याची माहीती प्रशासनाकडे ऊपलब्ध नसल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची चौकशी करून भयभीत झालेल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गंगाखेड तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 


गंगाखेड शहर आणि तालुक्याला आज सकाळी साडे आकराच्या सुमारास जबर धक्का जाणवला. यावेळी स्फोट झाल्यासारखा आवाजही झाला. यात शहरातील काही भागातील ईमारतींच्या काचा तडकल्या. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या संदर्भाने गंगाखेड तहसील प्रशासनाकडे चौकशी करूनही काहीही माहीती मिळू शकलेली नाही. यामुळे नागरिकांच्या मनातील भीतीत वाढ झालेली आहे. ही भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने हा स्फोट नेमका कशाचा होता, याची चौकशी करणे आवश्यक आहे. ती करून नागरीकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या