💥नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातल्या वखारी गावात एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून निर्घृण हत्या...!💥भयंकर हत्याकांडाने जिल्हा हादरला असून पोलिसांचा तपास सुरु आहे💥

नाशिक (दि.०७ अॉगस्ट) - जिल्ह्यात सर्वत्र कोरोना महामारीने धुमाकूळ घातल्याने कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिक प्रचंड दहशत निर्माण झाली वावरत असतांना जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे.नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, नांदगावमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची झोपेतच असताना निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून अद्याप मारेकऱ्यांस पकडण्यास यश आलेले नाही तसेच या पाठीमागचे कारण देखील स्पष्ट झालेले नाही 

नांदगाव तालुक्यातील वखारी इथं ही घटना घडली आहे. चव्हाण कुटुंबीय हे नेहमी प्रमाणे आपल्या घराबाहेर झोपलेले असताना गुरुवारी मध्यरात्री मारेकऱ्याने समाधान चव्हाण (वय ३७) भरताबाई चव्हाण (वय ३२) गणेश चव्हाण (वय ६) आरोही चव्हाण (वय ४) अशा चौघांची झोपेतच तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. मारेकऱ्याने आईच्या शेजारीच झोपलेल्या चिमुरड्या आरोहीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही. ह्या हत्याकांडाने जिल्हा हादरला असून पोलिसांचा तपास सुरु आहे .
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतले आहे. चौघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मयत कुटुंबीय हे सर्वसाधारण आर्थिक स्थिती असलेले आहे .पती समाधान रिक्षा चालवित असे पण लाँकडाऊनमुळे तोही घरीच होता.बायको भरताबाई मोलमजूरी करीत असे त्यामुळे या हत्याकांडामागे गुन्हेगार दरोडेखोर कि विकृत यावर पोलिसांची नजर असून कुणाशी वाद वगैरे झाला होता का ? या दृष्टीने देखील पोलिसांचा तपास सुरु आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या