💥जिंतूर बोरी समझोता ठरल्याप्रमाणेच,अजित दादांचा निर्णय अंतिम मानू - माजी आ विजय भांबळे💥निर्णय स्वतः खासदार जाधव,आ.बाबाजानी साहेब व माझ्या एकमतानेच झाला होता💥

जिंतूर
परभणीचे खासदार संजयजी जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळाली, ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप केला आणि जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळ नेमणुकीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की, महाविकासआघाडी सरकार हे ३ पक्षाचं आहे. प्रत्येक पक्षाला मतदारसंघातील ताकदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत संधी देण्याचे तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेलं आहे. जिंतूर-सेलू मतदारसंघाबाबत माहिती घेतली तर याठिकाणी जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समित्या, नगर परिषद, ग्रामपंचायतीवर निर्विवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे. त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्राधान्य मिळणे हे क्रमप्राप्त आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर राष्ट्रवादीचा हक्क आहे आणि त्यानुसारच राज्य सरकारच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक केली. या बदल्यात तालुक्यातील दुसरी बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेला देण्यात येईल असे ठरले. महत्वाचे म्हणजे हा निर्णय स्वतः खासदार साहेब, आ.बाबाजानी साहेब व माझ्या एकमतानेच झाला होता.

जिंतूर बाजार समिती राष्ट्रवादीला तर बोरी बाजार समिती शिवसेनेला देण्याचा हा विषय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना माहीत होता आणि त्यांच्या संमतीनेच हे झाले. याउपर मा.खासदार यांना हे मान्य नसण्याचे कारणच उद्भवत नाही.

परभणी जिल्हा परिषदेत आम्हाला इतर पक्षाची आवश्यकता नसताना सुद्धा शिवसेनेला सोबत घेतलं आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच एक महत्त्वाचं सभापती पद शिवसेनेला देऊ केले आणि जिंतूर मतदारसंघात शिवसेनेचं प्राबल्य कमी असताना सुद्धा बोरी बाजार समिती शिवसेनेला देण्याचे ठरलं, कारण महाविकासआघाडी सरकारच्या पक्षांनी एकत्रित काम करावं अशी आमची भूमिका आहे. तरी देखील शिवसेनेवर राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केला म्हणणे योग्य ठरणार नाही असे मला वाटते.

या सर्व प्रकरणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पक्षाचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय घेतील तो मला पूर्णतः मान्य राहील असे मा.आ.विजराव भांबळे म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या