💥राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकार कडून परभणी जिल्ह्याची पुन्हा एकदा उपेक्षा...!💥परभणीकरांच्या मागणीला केराची टोपली दाखवत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पळवले उस्मानाबादला💥परभणी (दि.30 अॉगस्ट) - मागील अनेक वर्षापासून सातत्याने परभणी जिल्ह्याची उपेक्षा करण्याचा कुटील डाव आखल्या जात असून वेळोवेळी परभणी जिल्ह्यावर राज्यशासनासह केंद्र शासनाकडूनही अन्याय होत असतांना मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी शासन दरबारी जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यात सातत्याने अपयशी का ठरत आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची कधीही जिल्ह्यातील जनसामान्यांनी तसदी घेतली नी ही फार मोठी शोकांतीका म्हणावी लागेल मागील गेल्या अनेक वर्षापूर्वी पासुन परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी सातत्याने शासनाकडे केली जात आहे मात्र अचानक सह्याद्री अतिथी गृहावर गुरुवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमीत देशमुख सह ना.आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितत झालेल्या बैठकीत उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्याल सुरु करण्यासाठी  तत्वतः मान्यता देण्यात  येवुन पुढील  प्रक्रिया लवकर सुरु करण्याचे निर्देश देण्यात आल्याने पुन्हा एकदा सत्ताधारी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून असलेल्या परभणी जिल्ह्यातील  नागरीकांच्या मागणीस वाटाण्याच्या  अक्षदा देऊन राज्यातील ठाकरे सरकारने सप ठेंगा दाखवला अशी जनतेत भावना व्यक्त होताना दिसुन येत आहे .


मागील अनेक वर्षापूर्वी पासुन परभणी जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची शासनाकडे मागणी आहे.यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या सहकार्याने अनेक निवेदने,आंदोलने झाली .मागील काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत सकारात्मक भुमिका घेत या परभणी करांच्या रास्त भुमिकेस तत्त्वतः  मान्यता दर्शवली. यामुळे परभणी करांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या .
मात्र नुकत्याच झालेल्या विधान सभा निवडणुकी नंतर सत्तांतर झाले .तसेच सर्व राजकीय पक्षांना व नागरिकांना या वैद्यकीय महाविद्यालयाचा विसर पडला.
मात्र अचानक मराठवाड्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला सुरु होण्यासाठीच्या प्रक्रियेने वेग घेतला असुन त्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमीत देशमुख यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात येवुन पुढील प्रक्रिया वेगाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे ठाकरे सरकारने पुन्हा परभणी करांना ठेंगा दाखवित तोंडाला पाने पुसल्याची भावना नागरीकांत दिसुन येत आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्व पक्षीय पुढाऱ्यांच्या जिल्हा विकासा बाबतच्या उदासीन कार्येशैलि बाबत तीव्र असंतोष पसरला आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या