💥परभणी जिल्हा संभाजी सेनेच्या आंदोलनाला अखेर यश; जिल्ह्याला मिळाले निटचे सेंटर...!



💥संभाजी सेनेच्या निवेदनाची केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री  प्रकाश जावडेकर यांनी घेतली दखल💥

परभणी (दि.२७ आॕगस्ट) परभणी जिल्हा संभाजी सेनेच्या वतीने परभणी जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना निटचे सेंटर उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी गेली दोन तीन वर्षांपासून आंदोलन चालू होते.संभाजी सेनेने कठोर भुमीका घेत १३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निटच्या परिक्षेसाठी आम्ही विध्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यात पाठवणार नाहीत आणि विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्यास प्रशासनच जबाबदार राहिल असे स्पष्ट निवेदनाद्वारे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री  प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती केली संभाजी सेनेच्या मागणीला केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री  प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री ठाकरे प्रतिसाद देत परभणीला निटचे सेंटर उपलब्ध करून दिले त्याबद्दल संभाजी सेनेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून संभाजी सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे यांनी संबंधितांसह या कामासाठी सहकार्य करणाऱ्या खासदार फौजिया खान आणि माजी आमदार विजयराव गव्हाणे यांचे जाहीर आभार मानले आहे..



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या