💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेडात कोरोनाने घेतला एकाच कुटुंबातील दोन भावांचा बळी....!💥लहान भावा पाठोपाठ मोठ्या भावालाही कोरोनाने ओढले मृत्यूच्या दाढेत💥

परभणी (दि.02 ऑगस्ट) -जिल्ह्यात कोरोनाचा अतिरेकी प्रकोप सातत्याने वाढतांना दिसत असून जिल्ह्यातील गंगाखेड शहरात तर सातत्याने कोरोना बाधीतांचा बळी जात असल्याचे पाहावयास मिळत असून शहरातील खडकपुरा गल्लीतील एकाच कुटूंबातील लहान भावा पाठोपाठ मोठ्या भावाचा आज रविवार दि.02 ऑगस्ट रोजी सकाळी मृत्यू झाल्याने त्या  कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे त्यामुळे गंगाखेड शहरात मोठी अस्वस्थता पसरली आहे.कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने संपूर्ण शहर दहशतीखाली वावरत आहे. चोहूबाजुंच्या वसाहतींमधुन कोरोनाने डोके वर काढले असुन दररोज एकापाठोपाठ एक बाधित व्यक्ती आढळू लागले आहेत. खडकपूरा गल्लीतील एका व्यक्तीस काहीसा त्रास सुरू झाल्याने कुटूंबियांनी त्या व्यक्तीस परभणीतील खासगी रुग्णालयात तात्काळ दाखल केले. उपचार सुरू होते. परंतु न्युमोनिया निघाल्याने कुटूंबियांनी त्यास औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. औरंगाबादेत उपचार सुरू असताना त्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या मोठ्या भावासही कोरोनाचा प्रादूर्भाव झाला. त्यांच्यावरही तेथेच उपचार सुरू झाले. लहान भाऊ उपचारादरम्यान मृत्यू पावला. तर रविवारी (ता.दोन) कुटूंबियांनी त्या व्यक्तीच्या दहाव्या निमित्ताने विधीची तयारी सुरू केली असतानाच मोठ्या भावाचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची बातमी कुटूंबियांपर्यंत धडकली. तेव्हा संपूर्ण कुटूंबियांवर मोठी शोककळा पसरली. अवघ्या दहा दिवसातच दोन कर्त्या सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने गंगाखेडात मोठी अस्वस्थता पसरली आहे. दोघेही भाऊ गंगाखेडात दोन हंसोका जोडा म्हणून परिचित होते. हे दोघेही भाऊ गंगाखेडातील त्या स्वागत समारंभातील व्यक्तींच्या संपर्कात आल्याची माहिती हाती आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या