💥जिल्हा रुग्णालयातील त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने पुर्णेत चिंता वाढवली....!💥शुक्रवारी आले होते पाॅझीटीव्ह पत्नीच्या खाजगी दवाखान्यात केली रुग्णांची तपासणी💥

पूर्णा (दि.०९ पुर्णा शहरातील आनंदनगर भागातील रहिवासी असलेले व जिल्हा रुग्णालयाच्या प्रशिक्षण केंद्रातील ३८ वर्षीय वैद्यकीय अधिकारी हे पुर्णा शहरातील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी ७ रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड अॅन्टीजन टेस्ट मध्ये बाधीत आढळून आले होते.तत्पुर्वी त्यांनी आपल्या पुर्णेत वैद्यकीय अधिकारी असलेल्या पत्नीच्या खाजगी दवाखान्यात शहरासह तालुक्यातील अनेक रुग्णांची तपासणी केली असल्याचे सदरील रुग्णांकडून चर्चीले जात आहे.

पुर्णेत राहणाऱ्या त्यांच्या शिक्षीका बहीणीच्या घरी वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थिती लावली.या वास्तुशांती कार्यक्रमात बाहेरगावाहून आलेले काही पाहुणे मंडळींनीही उपस्थित असल्याची जोरदार चर्चा अंबिका नगर भागात आहे .शनिवारी ८ रोजी त्यांच्या परिवारातील सदस्यांची तपासणी करण्यात आली यात त्यांची एक ७ वर्षीय मुलगी करोना ग्रस्त आढळून आली.या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुर्णेत ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेली पत्नी यांचा शहरात आनंदनगर भागात दवाखान्यात आहे.त्यांच्या दवाखान्यात अर्धवेळ खाजगी लॅब टेक्नीशिअन म्हणुन काम करणारी आरोग्य विभागातील एक कंत्राटी महीला कर्मचारी सात ते आठ दिवसांपूर्वी बाधीत आढळली होती.त्या महीला कर्मचा-याच्या संपर्कात हे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱे वैद्यकीय अधीकारी व त्यांचे कुटुंबीय संपर्कात आले होते असे अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या