पूर्णा (परभणी) : तालुक्यातील सुहागन जवळील ओढ्याच्या पुलावरुन अवैधरित्या वाळूची वाहतुक करत असलेले एक पिकअप वाहन पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवार २७ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता हि कारवाई करण्यात आली.
पोउपनि.माणिक गुट्टे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख ईम्मु, शेख साजिद आणि इतर एका विरोधात विना परवाना बेकायदेशीर रित्या वाळूची चोरटी वाहतुक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोह. नळगीरकर करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या