💥मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून मेडिकल कॉलेजचं ठोस आश्‍वासन - खा.संजय जाधव



💥वैद्यकीय प्रवेशातील 70ः30 चा अन्यायकारक फॉर्म्युला रद्द करण्यासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल💥

परभणी / परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्यासह मराठावाड्यातील विद्यार्थ्यांकरिता वैद्यकीय प्रवेशातील 70ः30 चा अन्यायकारक फॉर्म्युला रद्द करण्यासंदर्भात येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे खा.संजय जाधव यांनी  गुरूवारी (दि.27) रात्री मुंबईहून प्रसारमाध्यमांना बोलतांना दिली. 

मुख्यमंत्री ठाकरे यांची सायंकाळी वर्षा या शासकीय निवासस्थानी आपण भेट घेतली. त्यातून काही विषयाबाबत असणारी नाराजी प्रगट केली. विशेषतः शिवसैनिकांवरील अन्याय, सत्तेतील भागीदारीचा विषय प्रामुख्याने निदर्शनास आणून दिला. त्या विषयी श्री ठाकरे यांनी आपणास पूर्णतः आश्‍वासीत केले, असे नमुद करीत खा.जाधव यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलेल्या शब्दावर आपला पूर्णतः विश्‍वास आहे, असे स्पष्ट केले. यावेळीच आपण परभणीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय प्रामुख्याने मांडला. या विषयात ठोस हालचाली होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यावेळीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना तात्काळ पाचारण करीत या विषयात लक्ष घालून अडथळे दूर करण्याचे निर्देश दिले. पाठोपाठ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाकरिता 70ः30 चा अन्यायकारक फॉर्म्युलाही दूर करण्या संदर्भात तात्काळ विचारविनिमय करावा व सकारात्मक निर्णय घ्यावा, असेही निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्याची माहिती खा.जाधव यांनी प्रसारमाध्यमांना बोलतांना दिली.
पूर्णा शहरवासियांच्या पाणीपुरवठयाच्या दृष्टीने पूर्णानदीवर ममदापूरजवळ बंधारा उभारणी संदर्भातही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे बंधारा उभारणीच्या कामांना जलगतीने हालचाली सुरू होतील, असा विश्‍वास खा.जाधव यांनी प्रसारमाध्यमांना बोलतांना व्यक्त केला. मंत्री महोदय जयंत पाटील हे या अनुषंगाने पूर्णेची परिक्रमा करणार आहेत, अशीही माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या