💥पुर्णेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवज्ञा; कानडखेडच्या सरपंचासह अन्य एकावर गुन्हा दाखल...!


💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचा आदेश धुडकावून पोळा साजरा करणे पडले महागात💥

पुर्णा/तालुक्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर सर्वत्र जमावबंदी लागू असताना तालुक्यातील मौजे कानडखेड येथे सरपंचासह अन्य एकास पोळा सण साजरा करणे भलतेच महागात पडले असुन त्यांच्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात जिल्हाधीकारी यांचे जमावबंदी आदेश धुडकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण बैल पोळा आहे.परंतु यंदा सर्वत्र कोरोना विषाणूचा पार्दुभाव होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात संचारबंदी ,जमावबंदी लागू केली आहे.असे असतानाही पुर्णा तालुक्यातील मौजे कानडखेड येथील सरपंच तुकाराम सखाराम सालपे व सुजान सखाराम सालपे यांनी मंगळवारी १७ रोजी सायं ४ वाजण्याच्या सुमारास बैल पोळ्याच्या सणां निमीत्य गावातील हनुमान मंदिराजवळ बैलांची मिरवणूक काढून बैल पोळ्याचा सण साजरा केला.व जिल्हाधीका-यांनी काढलेले संचारबंदी,जमावबंदीचे आदेश धुडकावले.याप्रकरणी पुर्णा पोलिस ठाण्यात पोलीस पाटील कविता गोपीनाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरपंच तुकाराम सखाराम सालपे व त्यांचे बंधु सुजान सखाराम सालपे यांच्या विरोधात १४४ कलम भंग केल्याप्रकरणी कलम १८८,२६९,२७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या