💥पुर्णा तालुक्यातील गौर शिवारात शेतावरील ६५ वर्षीय साल गड्याचा संशयास्पद मृत्यू...!💥मयत इसम रुस्तूम मस्के अग्रवाल यांच्या शेतात सालगडी म्हणून होते कामाला💥

पुर्णा (दि.०२ आॕगस्ट) तालुक्यातील गौर शेत शिवारातील हनुमान अग्रवाल यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला असलेल्या एका ६५ वर्षीय इसमाचा आज रविवार दि.०२ अॉगस्ट रोजी सकाळी १०-३० ते ११-०० वाजेच्या सुमारास शेतात काम करत असतांना अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

गौर शेत शिवारातील अग्रवाल यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला असलेली मयत व्यक्ती हिंगोली जिल्ह्यातील असून मयताचे नाव रुस्तूम मस्के असल्याचे समजते सदरील व्यक्ती शेतातील गेट जवळ पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याचा किंचीत स्वासोश्वास चालत असल्याने शेतारील शेतकऱ्याने त्यास शासकीय ग्रामीण रुग्णालय पुर्णा येथे तात्काळ आणून दाखल केले परंतु ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्ती मयत झाल्याचे सांगितले मयताचे जवळील नातेवाईक सोबत नसल्यामुळे नातेवाईक आल्यानंतर मयताचे पार्थिव शव विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय परभणी येथे घेऊन जाण्याचा सल्ला संबंधितांना दिला असल्याचे समजते मयत रुस्तूम मस्के यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणांमुळे याचा उलगडा शवविच्छेदना नंतरच होईल परंतु सदरील घटना अत्यंत दुःखदायक व संशयास्पद असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असून संबंधित घटनेची तात्काळ चौकशी करून मयत सालगडी रुस्तूम मस्के यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी युवा नेते राज नारायनकर यांनी केली आहे...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या