💥बिड जिल्ह्यात कोरोना मुळे काल 9 कोरोना बाधीतांचा मृत्यू.....!💥जिल्ह्यात कोरोनामुळे आजपर्यंत मृत्युमूखी पडलेल्यांची एकूण संख्या 49 वर पोहोचली आहे💥


बीड, दि. 7 (प्रतिनिधी) :  सलग दुसर्‍या दिवशी बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूंने संक्रमित होणार्‍यांची संख्या शंभरावर गेली आहे.गुरूवारी 124 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.आज 7 ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास आलेल्या चाचणी अहवालात जिल्ह्यात 113 नवे बाधित आढळले आहेत. शुक्रवारच्या अहवालात सर्वाधिक २८ रुग्ण हे परळी तालुक्यातील आहेत. त्याखालोखाल केज 24 , अंबाजोगाई 22, बीड तालुका 20,  गेवराई-10, माजलगांव- 5, शिरूर-2, आष्टी-1, धारूर-1 अशा नव्या रुग्णांचा समावेश आहे.
आज सकाळी जिल्ह्यातील एकूण 652 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 532 निगेटिव्ह, 7 अनिर्णित तर 113 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.  दरम्यान, जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या 6 कोरोनाबाधितांचा आज शुक्रवारी मृत्यू झाला. आजपर्यंत बीड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमूखी पडलेल्यांची एकूण संख्या 49 वर पोहोचली आहे.
    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या