💥पुर्णा येथे ऑल इंडिया रेल्वे रिटायरमेंट फेडरेशन शाखा पूर्णाच्या वतीने 74 वा भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा…!💥कामगार चळवळीतील जेष्ठ़ कामगार नेते अध्यक्ष आशोक कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले💥 

पूर्णा : येथील ऑल इंडिया रेल्वे रिटायरमेंट फेडरेशन शाखा पूर्णाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने संघटनेच्या कार्यालयात रेल्वे कॉलनी पूर्णा येथे कामगार चळवळीतील जेष्ठ़ कामगार नेते अध्यक्ष आशोक कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. या प्रसंगी भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्ऩ डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतीमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिठाई वाटप करुन आनंद व्यक्त़ करण्यात आला. त्यावेळी लॉकडाउननियमांचे पालन करण्यात आले.
ऑल इंडिया रेल्वे रिटायरमेंट फेडरेशनचे विभागीय सचीव मा. भरत कांबळे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने सेवानिवृत्त़ रेल्वे कर्मचाऱ्यांना धेय-धोरणा प्रमाणे प्रामाणीक काम करावे असे मार्गदर्शन केले. शाखा पूर्णाचे सचीव मा. आमृत मोरे यांची प्रमुख उपस्थीती होती.
या प्रसंगी यशवंत लोखंडे, टि.झेड.कांबळे, प्रभाकर त्रिभुवन, महानंद गायकवाड, गंगाधर कांबळे, शीवाजी थोरात, बळीराम खारे, पत्रकार विजय बगाटे, शाहीर गौतम कांबळे इत्यादी कर्मचारी उपस्थीत होते. महानंद गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

 अध्यक्ष. आशोक कांबळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या