💥महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 68.33 टक्क्यावर...!💥राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 735 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत💥


मुंबई ( प्रतिनिधी) :   राज्यात आज 6711 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 58 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 68.33 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 9,181 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे, 

राज्यात सध्या 1 लाख 47 हजार 735 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
एकूण: बाधित रुग्ण-(5,24,513) बरे झालेले रुग्ण-(3,58,421),मृत्यू- (18,050), ॲक्टिव्ह रुग्ण-(1,47,735).

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या