💥परभणीत आज सोमवारी आढळले पुन्हा 28 कोरोना बाधीत रुग्ण...!💥एकूण 261 व्यापाऱ्यांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली💥

परभणी (28 आॕगस्ट) - शहर महापालिकेच्या वतीने शहरातील व्यापा-यांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत आहे. शहरातील सिटी क्लब सभागृहात 66,गांधीपार्कातील उद्देश्‍वर विद्यालय 79 व कल्याण नगर येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉल येथे 116 असे एकूण 261 व्यापा-यांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात 28 व्यापारी पॉझिटीव्ह आढळून आले. 


महापालिकेने सुरू केलेल्या रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट सेंटरची पाहणी आयुक्त देविदास पवार यांनी केली. यावेळी सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना सावंत, नोडल अधिकारी अभिजीत कुलकर्णी, समन्वयक गजानन जाधव, स्वच्छता निरीक्षक शेख शादाब, न्यायरत्न घुगे, डॉ.कलीमा बेग, ओम नवघरे, प्रसाद अवकाळे, गजानन पुरी, मंगेश चौधरी, डॉ.सुनिल उन्हाळे, प्रयोगशाळा तज्ञ गणेश सोलंके, संध्या उबाळे, अब्दुल रहेमान, चंद्रकांत ढवळे या सर्वाना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथ रोगप्रतिबंधक कायदा 1897 लागू झाला आहे. यानुसार या सर्वाची नियुक्ती याठिकाणी करण्यात आली आहे. आरोग्य विभाग कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच शहरातील भाजी व फळ विक्रेते, किराणा दुकान, व्यापारी, शहरातील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील हायरिस्क नागरिक खासगी रुग्णालयातून संदर्भीत केलेले संशयित रुग्ण इत्यादी अ‍ॅन्टीजन रॅपीड टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत  आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तपासणी चालू आहे. तरी शहरातील व्यापा-यांनी रॅपीड टेस्ट दि.15 ऑगस्ट पर्यंत करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या