💥बिड जिल्ह्यात एकून 230 कोरोना बाधीत रुग्ण आढळले...!


💥शहरातील 3170 व्यावसायिकांची अँटीजेन तपासणी, 137 कोरोना बाधित आढळले💥

बीड,  दि.11 (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात सोमवारी 10 ऑगस्ट रोजी सर्वाधिक संख्येने कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. सोमवारी 10 रोजी रात्री 11.15 वाजता प्राप्त झालेल्या चाचणी अहवालांमध्ये बीड जिल्ह्यात 230 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधित नवे बाधित हे बीड शहर व तालुक्यात 163 संख्येने आढळले आहेत.यामध्ये 137 रुग्ण हे अँटीजेन टेस्ट द्वारे चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. बीड -163, अंबाजोगाई -15, धारुर -3, गेवराई -3, केज -13, माजलगांव -7, परळी -15, आष्टी -8, शिरूर -3 असे एकूण 230 नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आज बीड शहरात  दुकानदार व व्यापार्‍यांच्या एकूण 3170 अँटीजेन रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये 137 जण बाधित आढळले. तर जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 3816 जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी 11 अहवाल अनिर्णित, 230 पॉझिटिव्ह आणि 3575 अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी बीड शहरातील 3170 व्यावसायिकांची अँटीजेन तपासणी, 137 कोरोना बाधित आढळले

 बीड शहरातील कोविड निदानासाठी झालेल्या विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी 6 तपासणी केंद्रावर 3170 व्यावसायिकांची कोविङ अँटीजेन तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये 137 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. बीड शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता  .जिल्हाधिकारी,बीड यांच्या आदेशानुसार बीड शहरातील सर्व व्यबसायीक व कामगार वर्ग यांची अँटीजेन तपासणी करण्याकरीता नियोजन करण्यात आले होते. सदर तपासणीकरता सहा ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती.
1. बलभिम महाविद्यालय,बीड
2.माँ वैष्णवीदेवी पॅलेस, एम.आय.डी.सी.रोड
3.जिल्हा परिषद शाळा ,अशोक नगर,
4.राजस्थानी विद्यालय,विप्रनगर
5.चंपावती प्राथमिक शाळा ,बुथ क. 1 नगर रोड
6.चंपावती प्राथमिक शाळा ,बुथ क.2 नगर रोड
या ठिकाणांचा समावेश होता.  सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, शिक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण 94 कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. लागण झालेल्या 137 नागरिकांना उपचाराकरीता हलविण्यात आले. सदर लोकांची तपासणी व निदान झाल्यामुळे इतर लोकांना होणारा प्रसार थांबविण्यास मदत होणार आहे. या विशेष मोहिमेला बीड शहरातील सर्व संघटनेच्या प्रतिनिधींनी याकामी मोलाचे सहकार्य करुन उत्सफूर्त प्रतिसाद नोंदविला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या