💥निवृत्ती वेतनधारकांची निवृत्तीवेतन विषयक अर्ज पोस्ट किंवा मेल द्वारे करण्याचे आवाहन...! 💥असे आवाहन सुनिल वायकर,जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांनी केले आहे💥    
    
परभणी (दि. 09 जुलै) :-  कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना कळविण्यात येते की, सद्या कोविड-19 ह्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कोषागार कार्यालयातील गर्दी व संभाव्य संसर्गजन्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्याअनुषंगाने निवृत्तीवेतनधारकांची निवृत्तीवेतन विषयक जी काही कामे आहेत, ती त्यांनी अर्जाद्वारे आवश्यक कागदपत्रांच्या प्रतिसह पोस्ट करावीत किंवा to.parbhani@zillamahakosh.in या मेल आयडीवर मेल करावीत. अत्यंत महत्वाचे किंवा प्रत्यक्ष ओळखपडताळणीची कामे असल्याशिवाय कार्यालयात येऊ नये. प्रत्यक्ष कामांच्या अनुषंगाने कोषागार कार्यालयाच्या संपर्क क्रमांक (02452) 225006 या दुरध्वणीवर संपर्क करावा असे आवाहन सुनिल वायकर,जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या