💥पुर्णा शहरातील मस्तानपूरा परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्याच्या घरावर पोलीसांची धाड..!💥पोलीसांनी टाकलेल्या धाडीत आढळला चार पोते भरून अवैध गुटख्याचा साठा💥

पुर्णा (दि.०६ जुलै) - शहरातील मस्तानपूरा परिसरात मागील अनेक दिवसापासून राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथी रोग नियंत्रण कायदा लागू असतांनाही मोठ्या प्रमाणात मानवी शरीरास हाणीकारक असलेल्या प्रतिबंधीत अवैध गुटख्याची तस्करीसह मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची गुप्त खबर मिळतात आज सोमवार दि.०६ जुलै रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास पुर्णा पोलीस स्थानकाचे स.पो.नि.प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकातील स.पो.उप.नि.पंढरीनाथ गंधकवाड,पोहेकॉ.विजय रणखांब,पोकॉ.समीर साबेर पठाण,पोकॉ.समीर अख्तर पठान,पोलीस मुख्यालयातील महिला पोलीस कर्मचारी जिंकलवाड,भोरगे यांनी नियोजनबध्दरित्या सापळा रचून तील एका अवैध गुटखा गुटखा विक्रेत्याच्या घरावर सापळा रचून मस्तानपूरा भागातील शेख शादूल बागवान नामक व्यक्तीच्या घरातून ४ पोते अवैध प्रतिबंधीत गुटखा जप्त केल्याची घटना घडली सदरील अवैध गुटखा रेट संदर्भात पुर्णा पोलीस प्रशासनाने जिल्हातील अन्न व औषधी प्रशासनास माहिती दिली असून संबंधित विभागाचे अधिकारी आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणिर असल्याचे समजते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या