💥उत्तर प्रदेश येथील कानपूर हत्याकांडातील गँगस्टर विकास दुबेला पोलीसांनी अटक...! 💥उज्जैन येथील महाकाल मंदिरातून पोलिसांनी घेतले ताब्यात💥

नवी दिल्ली : कानपूर हत्याकांडमधील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबेला उज्जैन येथील महाकाळ मंदिरातून पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर विकास दुबेने आधी उज्जैनच्या महाकाळ मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. विकास दुबेवर पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

मागील काही दिवसांपासून विकास दुबे हा पोलिसांना चकवा देत होता. उत्तर प्रदेश पोलीस एडीजी कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, विकासचा उजवा हात अमर दुबे बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत ठार झाला. तर आज सकाळी विकासच्या दोन अन्य साथीदारांना चकमकीत ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे.

कानपूरच्या बिकरू गावात गँगस्टर विकास दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर झालेल्या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह 8 पोलीस ठार झाले होते. या घटनेपासून यूपी पोलीस आणि एसटीएफची टीम विकास दुबेचा शोध घेत होते. यासंदर्भात पोलिसांनी बुधवारी सकाळी दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये छापा टाकला. विकास दुबे इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच तो तिथून पळून गेला. या छाप्यात फरीदाबाद पोलिसांनी विकास दुबेच्या तीन साथीदारांना अटक केली होती. अखेर उज्जैनी येथे गुरुवारी सकाळी विकास दुबेच्या मुस्क्या आवळण्यात अखेर यश आलं...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या