💥राजगृहावर विद्वन्स करणाऱ्या माथेफेरूंना त्वरित अटक करा - पूर्णेतील आंबेडकर वाद्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन...!💥माथेफेरूंना त्वरित अटक करून कडक शासन करण्याची व राजगृहाला कायमस्वरूपी संरक्षण देण्याची मागणी💥

पूर्णा (दि.०८ जुलै) :दादर,मुंबई येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकांसाठी बांधलेल्या "राजगृह" या इमारतीच्या समोर असलेल्या कुंड्याची तोडफोड तसेच तेथील काचा फोडुन पोबारा करणाऱ्या माथेफेरूंना त्वरित अटक करून त्याला कडक शासन करा व राजगृहावर कायमस्वरूपी संरक्षण व्यवस्था करा,अशी मागणी करणारे एक निवेदन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पूर्णेच्या तहसीलदार मा वंदना मस्के यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे,या निवेदनात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून,ह्या
घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे ह्या प्रकरणा मागे कोणाचा तरी
हात असल्याची शंका व्यक्त करण्यात आली असून


 संबंधितांची कसून चौकशी करण्यात यावी,कोरोनाची बिकट
परिस्थिती देशात आणि राज्यात असतांना कुणी तरी मुद्दाम आंबेडकरवादी समूहांना छेडण्याचा प्रयत्न केला आहे,ही
बाब गंभीर आहे,राज्य सरकारने या प्रकरणात जातीने लक्ष घालून गुन्हेगारांना अटक करून शासन करावे,अन्यथा आंबेडकरवादी लोक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील ,तास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असेल असा
इशारा देण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनावर पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी महास्थवीर,रिपाई नेते
प्रकाश कांबळे, नगरसेवक उत्तम खंदारे,ऍड हर्षवर्धन गायकवाड,ऍड धम्मा जोंधळे,दादाराव पंडित,सुनील जाधव,अनिल पंडित,बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्यामराव जोगदंड,शहराध्यक्ष त्रिम्बक कांबळे, शिवाजी वेडे,मोहन लोखंडे,गौतम ऍंगडे,मकासरे,संदीप सोनकांबळे,तुषार
गायकवाड, शिवा हातागळे आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या