💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे गावात आढळला पुन्हा एक कोरोना बाधीत रुग्ण,तालुक्यात २ रुग्णांची नोंद ...!💥धानोरा काळे येथील व्यक्ती औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असतांना स्वॅब घेतला तो आज पाॅझिटिव्ह आला💥

परभणी (दि.११ जुलै) : जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात आज शनिवार दि.११ जुलै रोजी शहरात १ आणी ग्रामीण भागात १ अश्या दोन कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली असून शहरातील रेल्वे कॉलनी परिसरात एक रुग्ण तर तालुक्यातील मौजे धानोरा काळे येथील एक आजारी असलेली व्यक्ती औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल झाली असता उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेतला, तो स्वॅब शनिवारी पाॅझिटिव्ह आला. 

या पार्श्वभूमीवर शहरातील रेल्वे परिसरासह धानोराकाळे हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्याचबरोबर सेलू तालुक्यातील वालुर येथील आंबेडकर नगरही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सुर्यवंशी यांनी दिली...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या