💥परभणी जिल्ह्याला कोरोनाचा हादरा; दिवसभरात आढळले २५ कोरोना बाधीत...!



💥मागील तीन दिवसांपासून कोरोनाने जिल्ह्यात कहर माजवला आहे💥

परभणी (दि.०८ जुलै) - जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोनाने एका पाठोपाठ एक हादरे देत असुन बुधवारी ८ रोजी जिल्ह्यात दिवसभरात एकुण २५ रुग्ण आढळून आल्याने जिल्हावासीयांची काळजी वाढली आहे.
            पाच दिवसांपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू होती.जिल्हाधीका-यांनी संचारबंदी त शिथीलता देत सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अस्थापना सुरू ठेवण्यास मुभा दिली.परंतु मागील तीन दिवसांपासून कोरोनाने जिल्ह्यात कहर माजवला आहे.गंगाखेड,सेलु,परभणी, तालुक्यात एकापाठोपाठ एक रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनही चक्रावले आहे.
आज बुधवार दि.८ जुलै रोजी दुपारी गंगाखेड येथील पुजा मंगलकार्यालयातील कोरोना बाधीत महीलेच्या संपर्कात आलेल्या ३ जणांना कोरोनाची लागणं झाल्याचा अवहाल प्रशासनास प्राप्त झाला होता.त्यासोबत परभणी तालुक्यातील २ व सेलु तालुक्यातील दोन रुग्ण आढळले होते दरम्यान रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अवहालानुसार
 शहरासह जिल्ह्यात गंगाखेड मानवत व अन्य तालुक्यात १९ कॉरोनाबधित व्यक्ती आढळल्या आहेत  अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरजोगे यांनी दिली, परभणी शहरात ९ गंगाखेड ५ मानवत शहरासह अन्यत्र हे रुग्ण आढळून आले आहेत .परभणी शहरातील जागृती मंगलकार्यालय परिसरातील ३४ वर्षीय पुरुष, सरफराज नगरातील ३ वर्षीय मुलगी ,२६ वर्षीय महिला तसेच ५६ वर्षीय महिला तसेच ७वर्षीय मुलगी करोना बाधित आढळली आहे, काद्राबाद प्लॉट भागात २८ वर्षीय, २५वर्षीय आणि ६३वर्षीय व्यक्ती बाधित आढळल्या आहेत , तालुक्यातील जाम येथील २० वर्षीय पुरुष कारेगाव येतील ३५ वर्षी व शहापूर येथील ३५ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे.मानवत शहरातील पोलीस वसाहतीत 2 जण बाधित आढळून आले आहेत गंगाखेड शहरात ५ व्यक्तीबधित आढळून आल्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या