💥परभणी जिल्ह्यात आज शनिवारी सायंकाळी पुन्हा सात कोरोना बाधीत रुग्णांची भर...!💥पुर्णा-गंगाखेड-मानवत-परभणी येथील कोरोना बाधीत रुग्णांचा समावेश💥

परभणी (दि.१८ जुलै) येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला आज शनिवार दि.१८ जुलै रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवाला मध्ये सात संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून या सात रुग्णात गंगाखेड येथील २,परभणी येथील १,पुर्णा येथील १,मानवत २,जिंतूर १,अश्या एकून ७ रुग्णांचा समावेश आहे.जिल्हा रुग्णालयात आज शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात गंगाखेड शहरातील देवळे गल्ली येथील १८ वर्षीय पुरूष,देवळे जिनिंग येथील ७५ वर्षीय महिला,पुर्णा शहरातील आनंद नगर येथील ५५ वर्षीय महिला,मानवत शहरातील पावर रुम येथील ५१ वर्षीय पुरूष,खंडोबा रोडवरील ५० वर्षीय महिला,तर परभणी येथील ५० वर्षीय महिला,जिंतूर येथील ७५ वर्षीय पुरूष,आदी रुग्णांचा समावेश असून जिल्ह्यात आतापर्यंत ३७५ रुग्णांना कोरोनाची लागन झाली आहे

💥पुर्णेकरांनो खबरदारी घ्या; शहरात पुन्हा आढळला १ कोरोना बाधीत रुग्ण....!

पुर्णा शहरात कोरोना हळूवारपणे पावले जरी टाकत असला तरी आता शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना जास्तच सतर्क राहावे लागणार असून रेल्वे परिसरात १ कोरोना बाधीत पुरुष रुग्ण आढळल्याची घटना अगदी ताजीच असतांना आज शनिवार दि.१८ जुलै रोजी सायंकाळी शहरातील आनंदनगर परिसरात राहणाऱ्या एका ५५ वर्षीय कोरोना संशयित महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची घटना घडली असून सदरील महिलेचा स्वॕब काल शुक्रवारी घेण्यात आला होता ज्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून या महिलेच्या संपर्कातील मुलगा,ननंद यांच्यासह ज्या खाजगी रुग्णालयात सदरील महिलेने विलाज केला होता त्या रुग्णालयातील डॉक्टरालाही क्वॉरंटाईन करण्यात आले आहे तर संबंधित कोरोना बाधीत महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या