💥परभणी जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढवा,अन्यथा मायक्रो कंन्टेनमेंन्ट झोन जाहीर करावा...!💥विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी अश्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत💥
  
परभणी (दि.10 जुलै) - कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह जिल्ह्यात दोन-तीन दिवस संचारबंदी लागू करण्याऐवजी किमान आठ दिवसांचा लॉकडाऊन करावा, अन्यथा प्रतिबंधीत क्षेत्रातच कठोरपणे संचारबंदीची अंमलबजावणी करावी, अशी सूचना विभागीय महसुल आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्त केंद्रेकर यांनी शुक्रवारी(दि.10) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व खात्यांच्या वरिष्ठ अधिका-यां बरोबर हितगुज करीत जिल्ह्यातील एकूण स्थितीचा आढावा घेतला तसेच महसुल, पोलिस, आरोग्य विभागाच्या अधिका-यांना काही उपयुक्त सूचना केल्या. विशेषतः त्या-त्या शहरामधून लॉकडाऊन करते वेळी दोन-तीन दिवसांच्या संचारबंदी लागू ऐवजी आठ दिवसांचा कालावधी घ्यावा किंवा त्या-त्या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्या-त्या भागातूनच संचारबंदीची कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश दिले आहेत. दोन-तीन दिवसांची संचारबंदी जाहीर करीत आपण फार मोठ्या प्रमाणावर काही साधू असे गृहीत धरू नये, असे स्पष्ट करीत आयुक्त केंद्रेकर यांनी सर्वाांना विश्‍वासात घेवूनच स्थितीचे गांभिर्य ओळखून प्रशासनाने तत्परतेने निर्णय घ्यावेत,असेही ते म्हणाले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या