💥नांदेड जिल्ह्यात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात तब्बल २५ रुग्ण गंभीर असल्याची बाब आली समोर...!



💥जिल्ह्यात ३० कोरोना बाधीतांच्या मृत्यूची नोंद💥

नांदेड (दि.१३ जुलै) - जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या वाढत्या संख्येसह कोरोनाच्या संसर्गामुळे मागच्या काही दिवसांमध्ये मृत्यू ही लोक पावत आहेत.आतार्यंत कोरोना मुळे जिल्ह्यात ३० जणांचा मृत्यू झाल्याची नाेंंद झाली आहे. तर तब्बल २५ कोरोना बाधीत   मृत्यूशी झुंज देत आहेत.या कोरोना बाधीत रुग्णांना या कोरोना विषाणू संसर्गातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय विष्णूपुरीतील वैद्यकीय अधिकार्‍यांसमोर निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या मनात मागील दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत कोरोनाने प्रचंड दहशत निर्माण केली असून कोरोना विषाणूंचा संसर्ग समुदायामध्ये वाढत असल्याने कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील ९ दिवसांच्या काळात कोरोना बाधीतांची रुग्णसंख्या दोनशेच्या पुढे गेली आहे. तसेच दिवसाकाठी एक ते दोन रुग्ण दगावत आहेत. तर ३० जणांना मृत्यूने कवटाळले आहे.

पूर्वी मृत्यू संख्या कमी होती. तेव्हा प्रकृतीगंभीर असणार्‍या रुग्णांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. परंतु रोजचा आकडा विसच्या पुढे जसा जात आहे. तशी प्रकृती गंभीर होत असलेल्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. काल रविवार दि.१२ जुलै २०२० रोजीच्या सायंकाळी प्राप्त झालेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालात तब्बल २५ रुग्ण गंभीर असल्याची बाब सुद्धा समोर आली आहे. यामध्ये १० महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या