💥सोयाबीन पिकाची पाने तात्पुरत्या स्वरुपात पिवळी पडत असल्यास उपाय योजना करण्याचे आवाहन...!


💥असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी केले आहे💥

बीड, (प्रतिनिधी) दि. १०:-जिल्ह्यांतर्गत २६५ मि.मी पाऊस झाला असून सोयाबीन या पिकाची पेरणी २ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर झालेली आहे. सध्या पिक १५ ते २५ दिवसाचे असून काही ठिकाणी ज्या जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे आणि जास्तीचा पाऊस झालेला आहे अशा ठिकाणी, त्याचबरोबर गावाशेजारच्या पांढरी मातीअसलेल्या जमिनीत लोह या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे
सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत असलेली दिसून येत आहे.सध्या काही जमिनी या लोहाच्या कमतरतेमुळे आणि वाफसा नसलेल्या जमिनीत नत्र अन्न्द्रव्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे सोयाबीन पिकाची पाने तात्पुरत्या स्वरुपात पिवळी पडली आहेत. अशा परिस्थिती मध्ये खालील उपाययोजना कराव्यात.

१.सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-२, ५० मिली+५० ग्रॅम युरिया प्रति १० लिटर पाणी किंवा

२.चिलेटेड लोह ४० ग्रॅम+चिलेटेड जस्त ४० ग्रॅम युरिया १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून
फवारणी द्यावी.

३.जमिनीतील अतिरिक्त पाणी बाहेर काढून द्यावे.
 सर्व संबंधित शेतकरी यांनी जर आपल्या सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडत असल्यास या उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बीड यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या