💥परभणी जिल्ह्यात आज बुधवारी आढळले १९ कॉरोना बाधीत रुग्ण...!💥परभणी शहरासह जिल्ह्यातील मानवत व गंगाखेड येथे ही आढळले कोरोना बाधीत रुग्ण💥

परभणी (दि.०८ जुलै) - जिल्ह्यात आज बुधवार दि.०८ जुलै रोजी परभणी शहरासह गंगाखेड मानवत व अन्य तालुक्यात १९ कॉरोनाबधित रुग्ण आढळल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे या आढळलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरजोगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. 
जिल्ह्यात आढळलेल्या १९ कोरोना बाधीत रुग्णाचा तपशील पुढील प्रमाणे आहे परभणी शहरातील जागृती मंगलकार्यालय परिसरातील 34 वर्षीय पुरुष, सरफराज नगरातील 3 वर्षीय मुलगी ,26 वर्षीय महिला तसेच 56 वर्षीय महिला तसेच 7 वर्षीय मुलगी करोना बाधित आढळली आहे, काद्राबाद प्लॉट भागात 28 वर्षीय, 25 वर्षीय आणि 63 वर्षीय व्यक्ती बाधित आढळल्या आहेत , तालुक्यातील जाम येथील 20 वर्षीय पुरुष कारेगाव येतील 35 वर्षी व शहापूर येथील 35 वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे
मानवत शहरातील पोलीस वसाहतीत 2 जण बाधित आढळून आले तर गंगाखेड शहरात 5 व्यक्ती कोरोना बधित आढळून आल्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या