💥बिड जिल्ह्यातील गेवराईच्या क्वारंटाईन सेंटर मध्येच एकाची गळफास घेवून आत्महत्या...!



💥शनिवारी रात्री ३५ वर्षीय तरुणाने कोरंटाईन सेंटर मधील पंख्याला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली💥

बिड (दि.१२ जुलै) - जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा जवळील बाभळदरा तांडा येथील काॅरंटाईन असलेल्या ३५ वर्षीय तरुणाने गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची भयंकर दुर्दैवी घटना शनिवार दि.११ जुलै २०२० रोजी रात्री ०९-३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.



             गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये काॅरंटाईन असलेल्या रा.बाभळदरा तांडा चकलांबा येथील संशयित असलेल्या एका ३५ वर्षीय तरुणास शुक्रवारी गेवराई शहरातील कोविड सेंटर मध्ये कोरंटाईन करण्यात आले होते. त्याचा थ्रोट स्वॅब शुक्रवार रोजी घेण्यात आला होता, त्याचा अहवाल येण्या आधीच त्याने शनिवारी रात्री कोरंटाईन सेंटर मधील पंख्याला रुमालाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्यावेळी तेथील न.प.कर्मचारी यांनी त्याचा जेवणाचा डब्बा देण्यासाठी दार वाजवले असता दरवाजा न उघडल्याने कर्मचाऱ्यांनी बाहेरून खिडकीत डोकावून पहिले असता त्यांना सदरील संशयित युवक गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
          या घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, फौजदार सुनील ऐटवार, विशाल प्रधान, राजू वाघमारे, आरोग्य विभागाचे डॉ.मुकेश कुचेरिया, तलाठी राजेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या