💥परभणी जिल्ह्यात आणखी तिन दिवस राहणार कडक संचारबंदी...!



💥जिल्ह्यातील गंगाखेड तालुका आणी परिसरात मात्र सात दिवस कडेकोट संचारबंदी💥

परभणी (दि.१२ जुलै) - जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील  केवळ अत्यावश्यक सेवा वगळता शहरी आणि ग्रामीण भागासह संपूर्ण परभणी जिल्ह्यात मध्ये तब्बल तीन दिवस कडकडीत संचारबंदीचे आदेश जारी केले असून तसे आदेश दस्तुरखुद्द जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जारी केले. असून आदेशात मात्र गंगाखेड तालुका आणि परिसरात दिवस कर्फ्यु राहणार असल्याचे नमूद केले असून या भागातील सर्व व्यवहार बंद असतील


परभणी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढते आहे चिंताजनक परिस्थिती निर्माण होते की काय अशी शंका येत असतानाच परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यातील भागामध्ये आणखीन तीन दिवस संचार बंदी आदेश जारी केले आहेत

 त्याचप्रमाणे गंगाखेड शहर व परिसरातील संपूर्ण आठ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश दिले असून या कर्फ्यु काळात कोणीही रस्त्यावर बाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे
परभणी जिल्ह्यातील नागरी भागात आणि लगेच या तीन किलोमीटर अंतरापर्यंत रविवारी मध्यरात्री पर्यंत संचार बंदीचे आदेश जारी करण्यात आले होते परंतु रुग्णांची संख्या लक्षात घेता आणखीन तीन दिवस म्हणजेच सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीनही दिवशी सर्व  भागाती संपूर्ण व्यवहार बंद असतील एवढेच नव्हे तर अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या