💥पुर्णा तालुक्यात संचारबंदीत हीं खुलेआम अवैध देशी-विदेशी दारुची मोठ्या प्रमाणात विक्री...!



💥शहरातील उच्चभ्रू वसाहतींमध्ये अवैध देशी-विदेशी दारु विक्रेत्यांनी निवासस्थानांत थाटली दुकान💥

परभणी/पुर्णा (दि.०४ जुलै) जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दि.०२ जुलै ते ०५ जुलै २०२० पर्यंत कडक संचारबंदीची घोषणा केली या तिन दिवसाच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवसायिक प्रतिष्ठाण बंद ठेवण्याचे आदेश असतांना तसेच राज्यात आपत्ती व्यवस्थापण कायदा व साथरोग प्रतिबंधक अधिनियम कायदा लागू असतांनाही शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यांनी उच्चभ्रू वसाहतींमध्ये स्वतःच्या निवासस्थानांतून अवैध देशी-विदेशी दारुची विक्री सुरू केल्याचे निदर्शनास येत असून या अवैध दारू विक्रेत्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा पुरवठा करतो तरी कोण ? 


या प्रश्नांचे उत्तर मात्र शोधण्याची व घटनेचा मुळापर्यंत तपास करण्याची तसदी कुठलाही अधिकारी घेत नसल्याने अवैध दारू विक्रेत्यांसह अवैध दारू विक्रेत्यांना दारूचा साठा पुरवणाऱ्यांची हिंमत कमालीची वाढल्याचे दिसत असून दि.०२ जुलै २०२० रोजी शहरात रात्री ९:४० वाजता सह पो नि प्रवीण धुमाळ, उप नि गुट्टे, जमादार सिद्दीकी, महिला पो का रफत, यांनी शहरातील अतिउच्चभ्रू वसाहत तसेच व्यापारपेठ असलेल्या जुना मोंढा परिसरातील श्रीराम मंदीर लगत अवैध दारू विक्री करत असताना आरोपी रामप्रसाद श्रीनिवास धूत याच्या घरातून ट्युबर्ग या विदेशी बियरचे दोन बॉक्स किंमत २६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपी रामप्रसाद धूत व बालाजी वसंतराव पवार यांच्या विरोधात पुर्णा पोलीस स्थानकात पो.कॉ.कवठेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दि.२ जुलै रोजी खुरेशी मोहल्ला परिसरात युनूस खान जब्बार खान पठाण रा. आनंद नगर हा अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने दारू साठा घेऊन जात असताना यांच्याकडे ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीचे लेबल असलेले तीन खंबे किंमत १६८० रू चा मुद्देमाल जप्त करून नरेंद्र घोडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान लॉक डाऊन च्या काळात बंदी असतांना ही अवैध दारू विक्रेते हे कायद्याला न जुमानता शहरासह तालुक्यात बिनबोभाटपणे अवैध दारू विक्री करत असल्याने दारुड्यांमुळे सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थाचा प्रशन निर्माण होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या