💥वाशिम जिल्ह्यातील कारंजात २७ वर्षीय तरुणीची छेड काढणाऱ्या नगरसेवकाला महिलांकडून चोप...!



💥या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून निसार खान यांच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल💥 

वाशिम (दि.११ जुलै) – कारंजा नगर परिषदेचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक निसार खान नजीर खान यांनी एका २७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान या घटनेनंतर छेड काढणाऱ्या नगरसेवकाला महिलांकडून चांगला चोप देण्यात आला असल्याची माहिती आहे.या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून निसार खान यांच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फियादी महिला ही आपल्या घरकामा निमित्त बाहेर जात असताना निसार खान हे नेहमी पाठलाग करत होता.पाठलाग का करतोस असे म्हटल्यास तो म्हणाला की हा माझा नेहमीचा मार्ग आहे. असे बोलल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र दि.१० जुलै रोजी निसार खान यांनी मला तुझा मोबाईल नंबर दे म्हणत असभ्य वागणूक करून सदर महिलेचे विनय भंग केले. पिडीत महिलेच्या तक्रारी वरून कारंजा पोलिसांनी कलम ३५४,३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली कारंजा शहर पोलीस करीत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या