💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातल्या गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा....!


💥गंगाखेड तहसिल प्रशासनाने केले आवाहन💥

परभणी (दि.२४ जुलै) जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात मुदगल बंधारा तसेच खडका बंधाराऱ्यातून पाणी सोडले जाणार असूनषहे पाणी गंगाखेड तालुक्यातील नदीपात्रात आज कोणत्याही क्षणी पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ होण्‍याची शक्यता आहे. 
गंगाखेड तालुक्यातल्या नदीकाठावरील सर्व गावांमधील ग्रामस्थांनी नदीपात्रामध्ये न जाण्यासंबंधी व योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन तहसीलदार कार्यालयाने केले आहे.
दरम्यान दवंडी देण्याची  कार्यवाही संबंधित गावाचे ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी करावी असेही म्हटले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या