💥पुर्णा तालुक्यातील गणपुर शिवारात अवैध चोरट्या रेतीने भरलेला टिप्पर पोलिसांनी पकडला...!💥लोकेशनवर असलेली बोलेरो जिपसह मोटारसायकल जप्त;पुर्णा पोलीस स्थानकात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल💥

पूर्णा (दि.०४ जुलै) - पुर्णा नदीपात्रातून अवैधरित्या उपसलेली चोरटी वाळू घेऊन जाणारा एक टिप्पर पुर्णा पोलिसांच्या पथकाने पकडला असुन त्या अवैध चोरट्या रेतीची रखवाली करण्यासाठी मागावर असलेल्या बोलेरो जिपसह मोटारसायकल ताब्यात घेऊन ६ जणांच्या विरोधात पुर्णा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १० लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी घटनास्थळावरुन जप्त केला आहे

पुर्णा तालुक्यातील गोदावरी-पुर्णा नदीच्या पात्रात    लाॅकडाउनच्या काळात प्रचंड प्रमाणात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून या चोरट्या रेतीची तस्करी करण्यासाठी रेती माफीयांच्या टोळ्या सरसावल्या असून या अवैध रेती तस्करी  करणाऱ्या तस्कर टोळ्यांमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील ही काही तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी विविध पक्ष पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याने या पांढरपेश्या खादीतील खच्चरांमुळे प्रशासनही कठोर कारवाई करण्यास अनेकवेळा हतबल होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णा तालुक्यातील कानखेड,कान्हेगांव,सुकी धनगर टाकळी,पिंपळगाव लिखा,कंठेश्वर परिसरातील पुर्णा नदीपात्रातून अवैधरित्या उपसलेली चोरटी रेती तस्करीसाठी रेती माफीया घेऊन गणपुर शिवारातुन जात असताना गणपुर गावाच्या जवळ रेल्वे पुला जवळच्या टि-पाईन्टवर पुर्णा पोलिसांनी सापळा रचून  टिप्पर क्रं एम एच-०४ सी जी-६७१६, ताब्यात घेतले.या टिप्पर सोबत मागावर असलेले  बोलेरो जीप क्रं-एमएच-२२यु-६२११, मोटारसायकल क्रं एम एच-२२ ए आर-८९१७ व चार मोबाईलटिप्पर लाही ताब्यात घेतले.घटनास्थळांहुन टिप्पर चालक सुभाष खंदारे व बापूराव डुकरे (जिप मालक) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.उर्वरीत चार आरोपी नामे आरोपी नवनाथ तुकाराम भुसारे टिप्पर मालक रा.नावकी, ज्ञानेश्वर उर्फ माऊली रावंदळे जीप चालक रा.धनगर टाकळी,  सोनाजी नामदेव पावळे रा. सुहागण, मोटारसायकल चालक  फरार झाले आहेत. एकूण १० लाख २ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी घटनास्थळावरुन जप्त केला आहे. पूर्णा पोलिस स्थानकात पोलीस कर्मचारी विजय रणखांब यांच्या फिर्यादीवरून आरोपी वरील सहा जणांच्या विरोधात पुर्णा पोलिस ठाण्यात वाळु चोरी, गौण खनिज कायद्या कलम, जमावबंदी संचारबंदी आदीं कलमांस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पो हे जरार सिद्दीकी, किशोर कवठेकर हे करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या