💥पुर्णेतील अभिनव विद्या विहार प्रशालेचे हेड क्लार्क दिलिप भाऊसाहेब माने सेवानिवृत्त....!💥३८ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर ३० जुन रोजी झाले सेवानिवृत्त,शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संस्थेने केला सत्कार💥

पूर्णा (दि.०२जुलै ) - येथील अभिनव विद्या विहार प्रशालेचे हेड क्लार्क दिलिप भाऊसाहेब माने यांनी ३८ वर्षे नौकरी करून मंगळवार दि.३० जुन २०२० रोजी सेवानिवृत्त झाले असून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. 


          पूर्णा शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना अंगणवाडी ते माध्यमिक पर्यंतचे  नामांकित व चांगल्या दर्जाचे शिक्षण अभिनव विद्या विहार प्रशालेत मिळते . त्याच शाळेतील दिलीप भाऊसाहेब माने ( लिपिक पदावर ) ३८ वर्षे काम करतांना जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला शिक्षण क्षेत्रातील कोणतीही अडचण असेल तर सहजपणे फोनवर मार्गदर्शन करत १९८२ ला शाळेत रुजु झाले तेव्हा शाळेची विद्यार्थी संख्या ५०० होती व कर्मचारी ३२ होते . त्यांनी पूर्ण वेळ विद्यालयाला दिला . गुणवत्ता वाढवत आज विद्यार्थी २५०० (दोन हजार पाचशे ) व कर्मचारी ६५ करून अभिनव परीवारात मानाचे स्थान मिळवले . शाळेच्या भव्य दिव्य आशा दोन  इमारती आर. टी .ई . कायद्यानुसार अत्याधुनिक सुविधा असणाऱ्या आहेत . व शाळेला तीन एकर वीस गुंठे जमीन मिळवून देण्यासाठी सहकार्य केले आहे . या कामामध्ये त्यांना कै . सत्यनारायण ओझा , कै गंगारामजी पाटील , कै . बालाप्रसाद अजमेरा यांनी पूर्णतः जबाबदारी सोपवली होती म्हणून ते करू शकले . कोव्हीड - १९ च्या नियमाचे पालन करत शाळेत हितचिंतकांनी एका नंतर एक येत सत्कार करून जात होते .त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनव परीवाराकडुन  संस्था अध्यक्ष गोपाळ अजमेरा , सचिव विजय लोणीकर , उपाध्यक्ष आनंद अजमेरा , हिराजी भोसले ,  विजय कदम, मुख्याध्यापक व्ही के तांबे ,  अदीनी माने कुटुंबाचा   सपत्निक सत्कार करण्यात आला .
चौकट
हिराजी भोसले
सेवानिवृत्त ज्येष्ठ मुख्याध्यापक
         दिलीप माने यांनी आपल्या पदापेक्षा खुप मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत संस्था व शाळेचा दुवा म्हणून आपल्या समयसुचक शांत मनमिळाऊ स्वभावाने कधीही कुणाला नाराज न करता सकारात्मक दृष्टीकोण ठेवुन शाळेला नामांकित व उच्च दर्जा मिळवून आज सेवानिवृत्त झाले त्यांना अभिनव परीवाराकडुन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तेव्हा आनंदअश्रू आवरता आले नाही .

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

  1. असे मेहनती ,संस्थेस वाहून घेतलेला ,सर्वांसाठी धडपडणारी व्यक्ती माझ्यातरी पाहण्यात नाही,संस्थेचा जो एवढा डोलारा उभा राहिला त्यात माने यांचा सिंहाचा वाटा आहे,Best wishes to him

    उत्तर द्याहटवा
  2. असे मेहनती ,संस्थेस वाहून घेतलेला ,सर्वांसाठी धडपडणारी व्यक्ती माझ्यातरी पाहण्यात नाही,संस्थेचा जो एवढा डोलारा उभा राहिला त्यात माने यांचा सिंहाचा वाटा आहे.लोणीकर सर कडून भावी आयुष्या साठी शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा