💥नांदेडला रविवारी तासाभरात दोन पॉझिटिव्ह रूग्ण दगावले...! 💥जिल्ह्यात आज रविवारी सापडले ४५ कोरोना बाधीत,जिल्ह्यातील मृत्युसंख्या झाली ३०💥

🛑 मयतात नांदेडचा वृद्ध आणि परभणीच्या तरुणाचा समावेश,मृत्युदर ५ टक्याच्या पुढे 🛑

नांदेड, दि.१२: रविवारी एका तासाच्या अंतराने दोन कोरोनाबाधित रुग्णांचा नांदेडला मृत्यू झाला. यातील एकावर २५ दिवसांपासून तर दुसऱ्यावर तीन दिवसांपासून उपचार सुरू होते.

या आठवड्यात नवे रुग्ण आणि बाधितांची संख्या वाढत चालली आहे. कालपर्यंत बाधित मृत्यूची संख्या २८ होती. आज दोन जण दगावल्याने ही संख्या आता ३० झाली आहे. हे दोघेही पूर्वीच्या अहवालात बाधित आलेले रुग्ण आहेत. जिल्ह्यात कालपर्यंत बाधित रुग्णांची संख्या ५८५ होती. रविवारचे अहवाल आणखी यायचे आहेत. बाधित रुग्णांच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्युदर आता ५.१३ झाला आहे.

परभणीच्या आनंदनगर येथील ३४ वर्षीय तरुणास श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या कारणावरून गेल्या ९ जुलै रोजी उपचारासाठी दाखल केले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारास प्रतिसाद दिला नसल्याने रविवारी सकाळी ११ वाजता त्याचा मृत्यू झाला.
नांदेडच्या सोमेश कॉलनी भागातील ७५ वर्षीय वृद्धावर गेल्या १७ जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गेली २५ दिवस त्यांची मृत्युशी झुंज सुरू होती. अखेर रविवारी सकाळी दहा वाजता प्राणज्योत त्यांची प्राणज्योत मालवली.

धर्माबाद तालुक्यातही कोरोनाचा प्रवेश झाला असून तेथील तीन जण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात येते. परंतु प्रशासकीय स्तरावरून त्यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही. दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नांदेड जिल्हा रविवारी रुग्णांचे सहावे शतक ओलांडून सहाशेच्या पुढे आकडा जाऊ शकतो, असे चित्र आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या