💥परभणीतील कोरोनाची विषारी घौडदौड रोखण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्वतःचा जिव धोक्यात घालून उतरले रस्त्यावर...!
💥जिल्ह्यात बेकायदेशीर घुसखोरी करणारे उल्हासनगर मधील ८ तर पुण्यातील २ व्यक्तीं घेतल्या ताब्यात💥

परभणी (दि.१५ जुलै) - जिल्ह्यातील कोरोना विषाणूंची वाढती विषारी घौडदोड रोखण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंबर कसली असून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर जिल्ह्याचे कर्तव्यकठोर जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय,उपविभागीय अधिकारी डाॅ संजय कुडेंटकरयांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावा पासून वाचवण्यासाठी स्वतःचा जिव धोक्यात घालून रस्त्यावर उतरल्याचे दिसत असून आज बुधवार दि.१५ जुलै रोजी जिल्ह्यातील प्रत्येक चेकपोस्टवर पहाटेची पासूनच सतर्क राहून बाहेर जिल्ह्यातून बेकायदेशीर जिल्ह्यात येणाऱ्यांना रोखण्याचे निर्देश दिले वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशा प्रमाणे हसूल पोलिस ठाणे व मनपाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्येक चौक परिसरात पहारे दिले आणि विनापरवाना येत असलेल्या व्यक्तींना पकडले.


यावेळी उल्हासनगर व पूण्याहून मधून एका वाहनाद्वारे कोणत्याही परवानगी विना बेकायदेशीरपणे प्रवास करीत परभणी पर्यंत थडकलेल्या १० व्यक्तींना एका पथकाने आज बूधवारी पहाटेच गंगाखेड रस्त्यावरील चेकपोस्टवर ताब्यात घेतले.उपविभागीय अधिकारी डाॅ संजय कुडेंटकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी तहसीलदार मंदार इंदूरकर, मनपाचे सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे आरटीओ गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांचे  एक पथक बूधवारी पहाटे अडीच पासून या चेकपोस्टवर ठाण मांडून होते.

पहाटे एक टेम्पो टॅव्हलर चेकपोस्टवर दाखल झाला असता या पथकाने त्या वाहनांची कसून तपासणी सूरू केली.तेव्हा वाहनधारकांकडे,प्रवाश्यांकडे कोणताही परवाना आढळला नाही.या दहा व्यक्तींना पोलिस व मनपांच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेवून जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी रवाना केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या