💥परभणी जिल्ह्यातील सेलू येथील भारतीय स्टेट बँकेतील १६ अधिकारी-कर्मचारी क्वारंटाईन...!💥बँकेतील कोरोना बाधीत कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या १६ जनांना आरोग्य विभागाने केले क्वारंटाईन💥

परभणी (दि.०५ जुलै) -जिल्ह्यातील सेलू येथील जवाहर रोडवरील भारतीय स्टेट बँकेचा एक कर्मचारी कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्‍वभुमीवर जिल्हा महसुल प्रशासनाने तीन दिवस बँक बंद ठेवण्याचा आदेश जारी केला. त्या पाठोपाठ आज रविवार दि.०५ जुलै रोजी आरोग्य विभागाने या बँकेतील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले आहे.


परभणी येथील वसमत रोडवरील विष्णुनगर येलील रहिवाशी असणाऱ्या सेलूतील भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याचा स्वॅब रविवारी पॉझिटीव्ह आढळून आला. सदरील कर्मचारी मागील १० दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. २७ जून २०२० नंतरतो कर्मचारी बँकेत कामावर गेला नाही.संबंधित कर्मचारी  मेडीकल रजेवर होता. परंतू २७ जून रोजी आणि त्या पूर्वीही बँकेत कामानिमित्त १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी तो संपर्कात आल्याने आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रविवारी या सर्व १६ जनांना तातडीने क्वारंटाईन केले आहे. एका हॉटेलमधून यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या