💥दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या परभणी जिल्हाध्यक्षपदी श्री मदन कोल्हे यांची निवड..!💥त्यांच्या या  निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे💥

परभणी (दि.०९ जुलै) येथील गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत उल्लेखनीय कार्य करणारे मदन मुंजाजी कोल्हे यांची नवी दिल्ली येथील इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या परभणी जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन ही भारत सरकारच्या मान्यतेने काम करणारी, संपूर्ण भारतातील सर्वात मोठा पत्रकार परिवार असलेली संस्था असून पत्रकारांसाठी काम करणारी विश्वसनीय संस्था असा या संस्थेचा नावलौकिक आहे. अशा या संस्थेच्या  परभणी जिल्हा अध्यक्षपदी श्री. मदन कोल्हे यांची अभिनंदनीय निवड  करण्यात आली आहे.
याबाबतचे निवडीचे पत्र आणि ओळख पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
  मदन कोल्हे यांनी पत्रकारितेची सुरुवात दैनिक गोदातीर समाचार मधून 1973 पासून सुरु केली असून  पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या बाबींना प्रकाशात आणण्याचे काम आपल्या धर्मभूमी या वृत्तपत्राच्या माध्यमातून करत आहेत.

समाजातील तेढ नाहीशी व्हावी, मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, समाजात एकी नांदावी आणि प्रत्येकाने आपल्या धर्माचा अभिमान बाळगून धर्माचरण करावे.यासाठी धर्म भूमी हे वृत्तपत्र दीपस्तंभा प्रमाने कार्य करत आहे.
चांगले धार्मिक संस्कार हा उद्याच्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया आहे, हेच ब्रीद घेऊन मदन कोल्हे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून भगीरथ प्रयत्न केले आहेत.

  त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन या संस्थेने त्यांची परभणी जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या या  निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या