💥परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील भंडारी कुटुंबीयांकडून आयोजित स्वागत समारंभाची चौकशी होणार...!💥जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी त्रिसदस्यीय समितीच्या द्वारे चौकशीचे दिले निर्देश💥 

परभणी (दि.२० जुलै) - जिल्ह्यातील गंगाखेड येथील भंडारी कुटुंबीयांकडून जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांची अवज्ञा करीत आयोजित स्वागत समारंभात हजेरी लावल्या कारणाने असंख्य लोकांना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने व जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांमध्ये मोठ्या प्रमायणात वाढ झाल्याने आता त्या स्वागत समारंभाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी समिती तातडीने गठीत केली आहे. 


जिल्ह्याचे निवासी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेंटकर जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांच्या त्रिसदस्यीय समितीच्या द्वारे भंडारी कुटुंबीयांकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.या कुटुंबीयांनी आयोजित समारंभासाठी रितसर परवानगी घेतली होती का ?  सदर स्वागत समारंभास नेमके किती लोक उपस्थित होते ? इत्यादी बाबींची त्रिसदस्यीय समितीने चौकशी करून अंतिम अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या