💥नांदेड जिल्ह्यात आज सोमवारी 51 अहवाल आले कोरोना पॉझिटीव्ह तर तिघांचा मृत्यू...!💥मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज सोमवार दि.20 जुलै रोजी कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत घट💥

नांदेड (दि.20 जुलै) - जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने एकीकडे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे तर दुसरीकडे शहरासह जिल्ह्यातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माणझाले आहे.जिल्हा प्रशासन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिवतोड मेहनत करीत आहे.मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज सोमवार दि.20 जुलै रोजी कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी मात्र कोरोना बाधीत रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आज 3 झाला  आहे.

जिल्ह्यात आज सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार 332 नमूने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 223 नमूने हे निगेटीव्ह आले असून 51 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 986 इतकी झाली, असून ही आकडेवारी जवळपास एक हजारापर्यंत आली आहे. त्याचसोबत 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे 515 झाले आहेत. तर उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 423 आहे. आज आलेले बहुतांशी रुग्ण हे नांदेड शहरातील आहेत.
तिघांचा मृत्यू
हिंगोली नाका येथील 64 वर्षीय महिलेचा,दि. 20 रोजी नायगाव येथील 26 वर्षीय महिलेचा तसेच देगलूर नाका येथील 65 वर्षीय इसमाचा कोरोना मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 42 रुग्ण हे नांदेड जिल्ह्यातील तर 7 रुग्ण हे इतर जिल्ह्यातील असून एकूण मृत्यू संख्या 49 झाली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या