💥परभणी जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली ३०२....!💥जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील एकूण ११ कोरोना बाधित रुग्ण झाले कोरोनामुक्त💥

परभणी (दि.१५ जुलै) - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षात उपचार घेत असलेले एकूण ११ कोरोना बाधित रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालय प्रशासनाने आज बुधवार दि.१५ जुलै रोजी सर्व औपचारिकता पूर्ण करीत या रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली.
जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांत परभणी शहरातील सरफराज नगरातील एकूण ९, विष्णू नगरातील ३६ वर्षीय पुरूष, गंगापुत्र कॉलनीतील ४५ वर्षीय महिला, जांब येथील ३६ वर्षीय पुरूष तसेच मानवतच्या पोलिस वसाहतीतील ५५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. 

वडगल्लीतील ५२ वर्षीय महिला,सरफराज नगरातील ५५ वर्षीय पुरुष, पोलिस क्वार्टरमधील ५२ वर्षीय पुरूष,सिंचन नगरातील २३ वर्षीय पुरूष, काद्राबाद प्लॉट येथील ४५ वर्षीय महिला, खासगी रुग्णालयातील ६० वर्षीय पुरूष व पालम तालुक्यातील सावंगी भुजबळ येथील ४५ वर्षीय पुरूष हे मंगळवारी मध्यरात्री कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापाठोपाठ बुधवारी दर्गा रस्त्यावरील गणेश नगरातील ३९ वर्षीय पुुरूष, मानवत येथील मेनरोडवरील ६७ वर्षीय महिला तसेच सेलू शहरातील सर्वोदय नगरातील ३० वर्षीय महिला, ३ व ६७ वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
आतापर्यंत एकूण ३०२ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून १५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठ रुग्ण मृत्यू पावले असून सध्या कक्षात १४५ रुग्ण आहेत. नव्याने एकूण १८२ संशयित बुधवारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ३६६२ संशयित रुग्ण असून २८९ रुग्ण संसर्गजन्य कक्षात आहेत.५८३ रुग्ण विलगीकरण केलेले आहेत. तर विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्यात २७९० व्यक्तींचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या