💥पुर्णा पोलीसांची नवा मोंढा परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्याच्या घरावर धाड..!



💥धाडीत १५,३००/ रुपयांचा अवैध गुटखा तंबाखूजन्य पदार्थ साठा जप्त,पोलीस पथकाशी आरोपींनी केली बाचाबाची💥

पुर्णा (दि.०६ जुलै) - शहरातील अवैध गुटखा-अवैध देशी विदेशी दारू विक्रेत्यांच्या विरोधात पुर्णा पोलीस स्थानकाचे स.पो.नि.प्रविण धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने आज सोमवार दि.०६ जुलै २०२० रोजी जोरदार मोहीम हाती घेतल्याने शहरातील अवैध गुटखा व अवैध देशी-विदेशी दारू विक्रेत्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली सपोनि.धुमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज सोमवारी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास शहरातील मस्तानपूरा भागात प्रतिबंधीत अवैध गुटखा विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून तब्बल चार पोते गुटखा जप्त केल्याच्या घटनेला अवघे चार तासच होत असतांनाच शहरातील नवा मोंढा परिसरातील अंबिका मंदीर जवळ अवैध देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या कडून मिळाल्याने पुन्हा दुपारी ०३-१० वाजेच्या सुमारास या परिसरातील देवा कन्हैयालाल सोलंकी याच्या घरावर धाड टाकली असता त्याच्या घरात मानवी शरीरास घातक असलेल्या प्रतिबंधीत अवैध विषारी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा तब्बल १५३००/-रुपयांचा साठा आढळून आला.

 या धाडी वेळी सपोनि.प्रविण धुमाळ व पथकातील महिला व अन्य कर्मचाऱ्यांशी आरोपी देवा कन्हैयालाल सोलंकी,मोहन डाबी,रामेश्वर मोहन डाबी व त्यांचे नातेवाईक ३ महिला या ६ आरोपींनी मिळून हुज्जत घालत अक्षरशः बाचाबाची करीत ढकलून देण्याचा व सरकारी कामात अर्थळा निर्माण करण्याचा गंभीर प्रकार घडल्याने सपोनि.प्रविण राजाराम धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादी वरून पुर्णा पोलीस स्थानकात नमूद सहा आरोपीं विरोधात गुरनं.२१४/२०२० कलम ३५३,१८८,२६९,२७०,२७१ भादवीसह कलम २,३,४,साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम ५१ (ब) व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा - २००५ सह कलम ७ (२),७ (३),२०कोटपा अधिनियम २००३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या