💥पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाचे कोरोना आजाराने दुःखद निधन....!



💥नगरसेवक दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्याचे 25 जून रोजी निदान करण्यात आले होते💥

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे 25 जून रोजी निदान करण्यात आले होते.साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषविले होते. शनिवारी सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याचे कळवण्यात आले आहे.

25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना कोरोनासह न्युमोनियाची देखील लागण झाली होती. दत्ता साने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून ते तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली होती. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्यांचे वाटप केले होते. यामुळे साने यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या