💥परभणी जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यां विरोधात गुन्हे दाखल करा- आयुक्त केंद्रेकर💥कोरोना विरूध्दचा संघर्षात माणुसकीचं दर्शन घडवा,परंतू कठोर भूमिका सुध्दा अंगिकारा असे ही केंद्रेकर यांनी आदेश दिले💥

परभणी (दि.11 जुलै) - कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाद्वारे मोठ्या प्रमाणावर उपाययोजना अवलंबिल्या जात असतांना सुध्दा आजही काही नागरिक मास्कविना बिनधास्तपणे फिरतीवर आहेत. अशा व्यक्तींना शोधून एक-दोन वेळा दंड पुन्हा सापडल्यास त्या विरोधात गुन्हे दाखल करा, असे आदेश विभागीय महसुल आयुक्त सुनिल केेंद्रेकर यांनी बजावले आहेत.


आयुक्त केंद्रेकर यांनी काल शुक्रवार दि.10 जुलै 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यां बरोबर आयोजित केलेल्या आढावा बैठकीतून काही उपयुक्त सूचना केल्या. तसेच कोरोना विरूध्दचा संघर्षात माणुसकीचं दर्शन घडवा, परंतू कठोर भूमिका सुध्दा अंगिकारा असे नमुद केले.
आपण औरंगाबाद येथून या जिल्ह्यात प्रवेश केला तेव्हा काही खेड्यामधून,  तालुकास्थानामधून सर्वसामान्य नागरिक बिनधास्तपणे मास्क न वापरता फिरत असल्याचे दुर्देवी चित्र जाणवल्याचे आयुक्त केंद्रेकर यांनी नमुद करीत कोरोना विषयी अद्यापही एवढी बेफिकरी अत्यंत धोकादायक आहे, असे म्हटले.
शहर व जिल्हा पोलिस व मनपा, पालिका यंत्रणेने मास्क न वापरणा-या विरूध्द कठोर भूमिका घ्यावी. विशेषतः दोन वेळा जागीच मोठा दंड वसुल करावा. त्यावर पुन्हा मास्क न वापरता सापडल्यास त्या नागरिका विरोधात थेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे आदेशही बजावले आहेत.
संचारबंदी, लॉकडाऊनच्या काळात दुकाने सर्रासपणे उघडी ठेवणा-या छोटया-मोठ्या व्यापा-यां विरोधात दंड ठोठावताना कोणत्याही प्रकारची कुचराई करू नये, कठोर भुमिका स्विकारावी. त्याशिवाय आता पर्याय नाही, असे आयुक्त केंद्रेकर यांनी नमुद केले असून जिल्हा प्रशासनाने याबाबत सतर्क रहावे. माणुसकी दाखवावी परंतू वेळप्रसंगी कठोरताही स्विकारावी, असे नमुद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या