💥परभणीत कोरोनाची वाटचाल सातत्याने सुरूच आज ३ जुलै रोजी आढळले ६ कोरोना बाधीत रुग्ण....!



 💥जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या 129 एवढी झाली आहे💥

परभणी (दि.०३ जुलै) - परभणी शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मागील आठवड्यापासून वाढ होतांना दिसत असून सातत्याने कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर पावले उचलतांना दिसत असतांनाही बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या लोकांमुळे कोरोना आपले पाय पसरवतांना पाहावयास मिळत असून आज शुक्रवार दि.०३ जुलै रोजी सायंकाळी कोरोना बाधित एकूण ६ रूग्ण आढळून आले आहेत. त्या सहा रुग्णात परभणी शहरातील काद्राबाद प्लॉट भागात १, नाथनगरात २, अजिजीया नगरात १, पंचशील नगरात १ व विकास नगरात १ असे एकूण परभणी शहरात ६ संशयित रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 


जिल्हा शासकीय रुग्णालयातून नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोगशाळेस संशयितांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. आज शुक्रवारी दुपारपर्यंत त्या प्रयोग शाळेत एकूण ४८ स्वॅब प्रलंबीत होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मेलद्वारे त्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून ६ एवढया संशयितांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या १२९ एवढी झाली आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व महसुल विभागात दिवस्दिवस वाढणा-या रुग्णांच्या संख्येने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच प्रशासनाने एकूण स्थितीचा आढावा घेवून तीन दिवसीय संचारबंदी लागू केली. त्याद्वारे नागरी भागात सावधगिरीच्या उपयायोजना अवलंबिल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात अन्य महानगरातून मोठ्या प्रमाणावर व्यक्ती व कुटुंबिय अधिकृत, अनाधिकृतपणे स्थलांतरीत होत असून त्यामुळेच जिल्हा महसुल, पोलिस प्रशासन चिंतेत सापडले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या