💥परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता; संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा दोन दिवस संचारबंदीत वाढ...!


💥संचारबंदीत शुक्रवार दि.१७ जुलै २०२० पर्यंत पुन्हा मुदतवाढ💥

 
परभणी (दि.१५ जुलै) - जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून वाचवण्याच्या दृष्टीने जिल्ह्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी गंगाखेड वगळून संपूर्ण जिल्ह्यात दि.१५ जुलै मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लागू केलेल्या संचारबंदीस आज पुन्हा येत्या दि.१७ जुलैपर्यंत मुदतवाढ बहाल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली असून तसे आदेश आज जारी केले आहे. 


नागरी क्षेत्रात दि.१० ते १२ जुलै या दरम्यान जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली होती. परंतू त्या संचारबंदीस दि.१२ जुलै ते १५ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली. ते करते वेळी नागरी क्षेत्रा ऐवजी गंगाखेड वगळून संपूर्ण जिल्ह्यातच संचारबंदीचा निर्णय घेतला होता. गंगाखेड शहरासह तालुक्या संदर्भात स्वतंत्र आदेश बजावून दि.१९ जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या