💥परभणी शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील नागरी भागात पुन्हा तिन दिवस संचारबंदी.....!💥उद्या शुक्रवार दि.१० जुलै रोजी दुपारी ०३-०० वाजल्यापासून ते रविवार दि.१२ जुलै चे मध्यरात्री पर्यंत राहणार संचारबंदी💥

परभणी (दि.०९ जुलै) - जिल्ह्यात सर्वत्र कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोरोना विषाणू  (कोविड-१९) या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होऊ नये म्हणून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी अतिशय दक्षता घेतली असून या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यातील नागरिकांना होऊ नये यासाठी त्यांनी वेळोवेळी आदेश काढून प्रतिबंधात्मक उपाय योजना केली असून याचाच एक भाग म्हणून शनिवार आणि रविवार संपूर्ण नागरी क्षेत्रामध्ये कडक संचारबंदी जारी करण्याचे त्यांनी ठरवले आहे
.

उद्या शुक्रवारी दुपारी ०३-०० वाजल्यापासून ते रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत परभणी पाथरी जिंतूर पूर्णा गंगाखेड सोनपेठ सेलू मानवत पालम या नागरी क्षेत्रात आणि त्याच्या हद्दीतील तीन किलोमीटर अंतर परिसरात विशेषतः परभणीच्या पाच किलोमीटर अंतरापर्यंत संपूर्ण संचार बंदीचे आदेश जारी केले आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या