💥नांदेड जिल्ह्यात १२ जुलै ते २० जुलै २०२० आठ दिवस राहणार कडक संचारबंदी....!



💥जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतला निर्णय💥

नांदेड (दि.१० जुलै) - जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यात दि.१२ जुलै २०२० ते २० जुलै २०२० या आठ दिवसाच्या कालावधीत कडक संचारबंदीचे आदेश कायम राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे.


जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रासाठी विविध अटी व शर्तीच्या अधीन राहून आस्थापना व दुकाने सकाळी ०९-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. संचारबंदीचे १००% पालन होते कि नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
दरम्यान, यावेळी सर्व शासकीय कार्यालये व त्यांचे कर्मचारी यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दवाखाने व मेडिकल स्टोअर्स ना संचारबंदीत सूट देण्यात आली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या