💥स्वदेशी विकसित कोवॅक्सिन या लसीची मानवी शरीरांवर तपासणी करण्यास परवानगी...!


💥एम्स सोमवारपासून चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक निरोगी लोकांची नोंदणी सुरू करणार💥 

नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था)  : शनिवारी  एम्सच्या नीतिशास्त्र समितीने कोविड-19 च्या मानवी शरीरांवर स्वदेशी विकसित कोवॅक्सिन या लसीची तपासणी करण्यास परवानगी दिली. आता यासाठी एम्स सोमवारपासून चाचणीत सहभागी होण्यासाठी इच्छुक निरोगी लोकांची नोंदणी सुरू करणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्यांच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील दिल्ली एम्ससह 12 संस्था निवडल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात  375 लोकांवर या लसीची चाचणी घेण्यात येणार आहे, त्यातील जास्तीत जास्त 100 लोक एम्सशी संबंधित असू शकतात. एम्समधील सेंटर फॉर कम्युनिटी मेडिसीनचे प्राध्यापक डॉ. संजय राय म्हणाले,  एम्स एथिक्स कमिटीने कोवॅक्सिनच्या मानवी चाचण्या सुरू करण्यास आज मान्यता दिली. ज्यांना इतर कोणताही आजार नाही, जे कोविड -19 पासून ग्रस्त नाहीत आणि ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि 55 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, अशा निरोगी व्यक्तींचाच या चाचणीत समावेश असेल.
  • पीजीआय रोहतकमध्ये कोरोना लसीची मानवी चाचणी सुरू
ते म्हणाले,  काही लोकांनी या चाचणीसाठी आधीच नोंदणी केली आहे. आता प्रत्येक व्यक्तीच्या चाचणी, आरोग्य इत्यादींचे मूल्यांकन करण्याचे काम सोमवार 20 जुलैपासून सुरू होईल.  त्यानंतर लसीची चाचणी फक्त केली जाईल. चाचणीत भाग घेऊ इच्छिणार्‍यांनी  एम्स वेबसाईटवर संपर्क साधावा.
कोवॅक्सिन ही लस आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबादच्या भारत बायोटेकने विकसित केलीआहे. त्याच्या मानवी चाचण्या नुकत्याच भारतीय फार्मास्यूटिकल्स ऑफ कंट्रोलर जनरल (डीसीजीआय) ने मंजुरी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या